...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केल्यानंतर लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे  मुंबईकरांसह वाहनेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने वाहने बंद होती. ही बंद असलेली  वाहने धोकादायक व अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

मुंबई : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केल्यानंतर लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे  मुंबईकरांसह वाहनेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने वाहने बंद होती. ही बंद असलेली  वाहने धोकादायक व अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा वाहनांची सर्व्हिसिंग  करून रस्त्यावर आणणे आवश्यक असल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे

तीन महिने धूळ खात असलेल्या गाड्या चालवण्यापूर्वी त्यांची योग्य ती सर्व्हिसिंग  करणे आवश्यक आहे.  सर्व्हिसिंग  न करता गाडी सुरू केल्यास गाडी पेट घेऊ शकते. त्यामुळे सर्व्हिसिंग केल्यानंतरच गाड्या रस्त्यावर आणा आणि अपघात  टाळा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना केले आहे. 

BIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...

काही दिवसांपूर्वी नाना चौक परिसरात असलेल्या उषाकिरण इमारतीत गाडी पेटल्याची घटना घडली होती. गाडीचा मालक गाडी घेऊन बाहेर गेला होता. परत आल्यानंतर तो गाडी पार्किंग करीत असतानाच तिच्या इंजिनातून धूर येऊ लागला. त्याने कसेतरी करून इंजिन बंद केले. मात्र, इंजिनसह गाडी क्षणार्धात पेटली. याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यावर जवानांनी ती आग विझवली. आगीच्या कारणांचा शोध घेतल्यावर ही गाडी तीन महिने बंद होती. त्यामुळे या गाडीच्या इंजिनमधील इलेक्ट्रिक सर्किट खराब झाले होते. गाडी सुरू झाल्यानंतर सर्किटचा स्पार्क झाला आणि गाडी पेटली. 

मोठी बातमी - शिवसेना भवन आता शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद, कारण आहे...

विशेष म्हणजे गाडी घराबाहेर गाडी सॅनिटाईज करण्यात आली नव्हती आणि या गाडीत सॅनिटायझरही आढळले नाही, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी, गाडी चालवण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तिची रितसर सर्व्हिसिंग करा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: otherwise your vehicles may be burst out, fire brigade gives warning to people