esakal | नियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी? प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच...
sakal

बोलून बातमी शोधा

rto

लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला फक्त आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे; मात्र परराज्यासह राज्यातील खासगी बस वाहतूकदार सर्रास प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. प्रवासी वाहतुकीदरम्यान बसचालकांजवळ वाहनांची कागदपत्रे आणि ई-पास न आढळल्यास बसवर कारवाई केली जात आहे

नियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी? प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात लॉकडाऊन असले तरी राज्यासह परराज्यांतील खासगी बस वाहतूकदारांकडून सर्रास प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवरूनही परराज्यातील खासगी बस राज्याचा कर चुकवून प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यासोबतच राज्यातील खासगी बसेस वाहतूकदारांनीही प्रवासी वाहतूक सुरू केली आहे; मात्र यामध्ये ई-पास नसलेल्या आणि कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन न करणाऱ्या बसवर कारवाई कोणी करायची, असा संभ्रम प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला फक्त आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे; मात्र परराज्यासह राज्यातील खासगी बस वाहतूकदार सर्रास प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. प्रवासी वाहतुकीदरम्यान बसचालकांजवळ वाहनांची कागदपत्रे आणि ई-पास न आढळल्यास बसवर कारवाई केली जात आहे; मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप मुंबई बसमालक वाहतूकदारांनी केला आहे. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे

नुकतेच आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून गुजरात, राजस्थान राज्यातील खासगी बसने हजारो मजुरांना अवैध पद्धतीने राज्यात सोडण्याचे प्रकरण उघड झाले आहे. या वाहनांनी राज्याचा कर चुकवला असून, कोव्हिड-19 च्या नियमांचेही उल्लंघन केले असल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईला आता वेग आला आहे; मात्र अशा बसची तपासणी करताना आता ई-पास तपासण्याचे अधिकार परिवहन विभागाला नसून, पोलिस विभागाचे असल्याचे परिवहन विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आरटीओ विभागात संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 

BIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...

अभय कोणाचे?
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. एसटी महामंडळाची सार्वजनिक वाहतूकही बंद आहे. टॅक्सी आणि रिक्षालाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक करण्याचे निर्देश असताना राज्यातील खासगी बस वाहतूकदारांच्या बस कोणाच्या आदेशावर धावत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

परराज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीची माहिती वाहतूक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आणि लगेच त्यावर कारवाई करण्याचे आदेश निघाले. व्यवस्थापन चौकशीचे आदेश देण्यात आले. याचे प्रत्युत्तर म्हणून लगेच महाराष्ट्राच्या बसमालकांना त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 50 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई केल्याने त्याचा आम्ही निषेध करतो.
- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बसमालक संघटना

पोलिस विभागाची ई-पास घेऊन खासगी बस प्रवासी वाहतूक करू शकतात; मात्र ई-पास नसल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. यापूर्वीही ई-पास नसलेल्या बस आणि वाहनांवर कारवाई केली आहे. ई-पास तपासण्याचे अधिकार पोलिस विभागाचे असले तरी आरटीओ विभागाकडून कारवाई होऊ शकते.
- शेखर चन्ने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग