मुंबईत आज 393 जणांना डिस्चार्ज; तर 1105 नव्या रुग्णांची नोंद.... 

मिलिंद तांबे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 78 दिवसांवर गेला आहे. तर 1 जुलै पर्यंत एकूण 5,46,620  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या असून  26 जुलै ते 1ऑगस्ट जुलै दरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर हा 0.90 इतका आहे. 

मुंबई : गत काही दिवसांपासून मुंबईत नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ते अकराशे या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने हळूहळू मुंबईवरील कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे चित्र आहे. रविवारी मुंबईत नव्याने 1,105 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1,16,451 झाली आहे. तसेच आज 49 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 6,444 इतकी झाली आहे. दरम्यान, मुंबईत आज 393 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 76 टक्के इतका आहे.

कशेडी घाटात वाहनांची वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणाकडे धाव...

मुंबईत आज नोंद झालेल्या 49 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 31 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. तर 31 रुग्ण 60 वर्षावरील होते तर 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. 

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

मुंबईत संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 809 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 82,445 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 393 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 88,299 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 78 दिवसांवर गेला आहे. तर 1 जुलै पर्यंत एकूण 5,46,620  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या असून  26 जुलै ते 1ऑगस्ट जुलै दरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर हा 0.90 इतका आहे. 
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1105 new patients detected in mumbai and 393 patients discharged from hospital