Thane News: पावसाळ्यातही ठाणेकरांवर पाणीबाणीचे संकट! १२ तासांचा पाणीपुरवठा बंद! कधी अन् कुठे?
Thane Water Supply: बुधवारी ठाण्यातील काही भागात १२ तासांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेने (टीएमसी) टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामे हाती घेतली आहेत. यामुळे ठाणेकरांना पाणीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.