esakal | अरे वाह! मेट्रो 4 वर भारतीय कंपनीचे तब्बल 234 मेट्रो रेक; मेक इन इंडियाला प्राधान्य..
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai metro

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (एमएमआरडीए)  वडाळा - विक्रोळी - कासारवडवली - गायमुख (मेट्रो 4 , मेट्रो 4 ए) या प्रकल्पाचे  काम सुरु आहे. आता या मार्गिकेवरही 234 भारतीय कंपनी मेट्रो रेकची निर्मिती करणार आहेत.

अरे वाह! मेट्रो 4 वर भारतीय कंपनीचे तब्बल 234 मेट्रो रेक; मेक इन इंडियाला प्राधान्य..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (एमएमआरडीए)  वडाळा - विक्रोळी - कासारवडवली - गायमुख (मेट्रो 4 , मेट्रो 4 ए) या प्रकल्पाचे  काम सुरु आहे. आता या मार्गिकेवरही 234 भारतीय कंपनी मेट्रो रेकची निर्मिती करणार आहेत. त्यासाठी बीईएमएल, बंबार्डियर आणि सीआरआरसी या तीन मेट्रो उत्पादक कंपन्यांनी एमएमआरडीएकडे निविदा सादर केल्या आहेत.

भारतातील मोठ्या प्रकल्पांमधूनही चिनी कंपन्यांना हद्दपार केल्यानंतर एमएमआरडीएने दहा मोनो रेल्वे तयार करण्यासाठी चिनी कंपनीच्या 500 कोटी रुपयांचे निविदा रद्द केल्या. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, विविध धोरणं जाहीर केली आहेत. 

हेही वाचा: भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....

त्यानुसार एमएमआरडीएने दहा मोनोरेलचे रेक निंर्मिती भारतीय कंपनीकडे देणार असून वडाळा - विक्रोळी - कासारवडवली - गायमुख (मेट्रो 4 , मेट्रो 4 ए) या मार्गिकेवरील 234 मेट्रो रेकची निर्मिती भारतीय कंपनीच करणार आहेत. 

यासाठी  भारत अर्थ मूवर्स लि. (बीईएमएल) ,सीआरआरसी आणि बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला यांनी एमएमआरडीए निविदा सादर केल्या असून अंदाजित 1865 कोटी रुपयांचा निविदा खर्च आहे . एका महिन्यात या निविदाचा अभ्यास केला जाणार आहे.  त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या पात्र निविदाकारांची निविड केली जाईल असे एमएमआरडीए प्रवक्तानी सांगितले. 

हेही वाचा: आणखी किती संकटांना तोंड द्यायचं मुंबईकरांनी? 'या' गैरसोयीसाठीही राहावं लागणार तयार

अशी असणार भारतीय कंपनी मेट्रो:

- गाडीचा वेग 90 किमी प्रतितास
- दरवाजा उघडण्याची वेळः 2.5 सेकंद 
- दरवाजा बंद होण्याच्या वेळाः 3.5 सेकंद 
-  सहा रेक ट्रेनची लांबी -  136 मीटर (अंदाजे) 
- प्रवासी क्षमता साधारणत: 980
- प्रत्येक डब्यातून 315 ते 350 जण प्रवास करू शकणार

234 metro rack on metro 4 read full story

loading image