अबब ! जाळ्यात अडकला 25 फुटी 'देव मासा', बोटीवरून किनाऱ्यावर आणायला लागली क्रेन

अबब ! जाळ्यात अडकला 25 फुटी 'देव मासा', बोटीवरून किनाऱ्यावर आणायला लागली क्रेन

मुंबई : ससून डॉक कुलाबा बंदरात आज एक भलामोठा देवमासा सापडला. या देव माशाला बघण्यासाठी बघ्यांनी डॉक मध्ये एकच गर्दी केली होती. या मासा अवाढव्य आहे की या माश्याला  बोटीतून बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यासाठी क्रेन चा वापर करावा लागला.

शार्क या जातीतील हा अवाढव्य मासा असून देवमासा या नावाने देखील तो ओळखला जातो. या माश्याची लांबी जवळ पास 25 फूट आहे.तर त्याचे वजन दोन टनाच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. हा मासा खोल समुद्रात सपाडतो अशी माहिती अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली.

स्थानिक मच्छिमार मच्छिमारीसाठी समुद्रात गेला असता त्याच्या जाळ्यात हा मासा अडकला. माश्याचे वजन अधिक असल्याने तो मासा बोटीत घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्या मच्छिमाराने तो मासा रात्री जाळ्यासह खेचत ससून डॉक् समुद्र कुनाऱ्यावर आणला. त्यानंतर क्रेनच्या मदतीने त्याने तो किनाऱ्यावर आणला असता मृत देवमासा असल्याचे त्याला कळाले. हे पाहून मच्छिमार घाबरून पळून गेला असल्याचे ही तांडेल यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती ही तांडेल यांनी दिली.

ससून डॉक् मधील एका व्यापाऱ्याने हा मासा केवळ दोन हजार रुपयांना विकत घेतला.देवमाश्याच यकृत अनेक महत्वाची औषध बनवण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे यकृताला मोठी मागणी असते शिवाय किंमत ही अधिक मिळते. शिवाय त्याच मांस आणि चरबी देखील काही प्रकारची औषधं आणि तेल बनवण्यासाठी वापरली जातात. 

वन्यजीव संरक्षित कायदा 1972 नुसार दुर्मिळ आणि संरक्षित सागर प्रजातींच्या मासेमारीवर बंदी आहे. महाराष्ट्राच्या समुद्रिभागात आढळणाऱ्या शार्क म्हणजेच देवमासा,पाकट आणि गिटार फिश संरक्षित सुचिमध्ये येतात. मात्र असे मासे काही प्रकारची औषधे बनवण्यासाठी वापरली जात असल्याने त्यांची छुपी मासेमारी केली जाते. त्यातीलच हा प्रकार तर नाही ना याबाबत ही चर्चा सुरू आहे.

( संकलन - सुमित बागुल )

25 feet long shark fish caught by fishermen at sasun dock read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com