esakal | 4 मे पासून एअर इंडियाच्या विमानांचं बुकिंग सुरु, 4 मेपासून देशांतर्गत विमानसेवेला होणार सुरुवात?
sakal

बोलून बातमी शोधा

4 मे पासून एअर इंडियाच्या विमानांचं बुकिंग सुरु, 4 मेपासून देशांतर्गत विमानसेवेला होणार सुरुवात?

कोरोनाचे आक्रमण सुरु असतानाच मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आली आहे. मुंबईतील विमानसेवा 4 मेपासून सुरु होणार आहे. 

4 मे पासून एअर इंडियाच्या विमानांचं बुकिंग सुरु, 4 मेपासून देशांतर्गत विमानसेवेला होणार सुरुवात?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई 18 : कोरोनाचे आक्रमण सुरु असतानाच मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आली आहे. मुंबईतील विमानसेवा 4 मेपासून सुरु होणार आहे. आता 4 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार असून ती सुरुवातीस मर्यादीत स्वरुपात असेल. तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा 1 जूनपासून सुरु होणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे.

एअर इंडियाने आपल्या संकेतस्थळावर पहिल्या टप्प्यातील विमानसेवा कोणत्या शहरांसाठी असेल हे जाहीर केलेले नाही, मात्र मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई, बंगळूर या मुख्य शहरातून विमानसेवा उपलब्ध असेल असे समजते. भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध ऊठवण्यात येणार आहेत, त्यामुळे देशातील विमानसेवाही टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहे.

मोठी बातमी - काय 20 एप्रिलनंतर घरपोच मद्य विक्री? एक मिनिट, आधी ही बातमी वाचा... 

आम्ही देशांतर्गत विमानसेवेचे आरक्षण 3 मेपर्यंत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे आरक्षण 31 मेपर्यंत स्थगित केले आहे. देशांतर्गत काही मार्गावरील विमानसेवा 4 मेपासून उपलब्ध असेल तसेच आंतरराष्ट्रीय सेवा 1 जूनपासून सुरु होणार आहे. त्याचे आरक्षण आता खुले झाले आहे. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन त्याची माहीती देण्यात येईल, असे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. संकेतस्थळावर नेमक्या कोणत्या सेवा सुरु होणार याची माहीती नाही, मात्र मुंबई - दिल्ली, मुंबई - कोलकत्ता, मुंबई - चेन्नई याचे दर देण्यात आले आहेत. 

मोठी बातमी -  खुशखबर ! बांधकाम कामगारांच्या थेट खात्यात येणार 'इतके' पैसे 

दरम्यान, सुरुवातीच्या फ्लाईटस््मध्ये दोन प्रवाशात सुरक्षित अंतर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकॉनॉमी क्लासमध्येही एका रांगेत सहाऐवजी चार प्रवासीच असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बोर्डिंग तसेच चेक इन करतानाही प्रवाशात अंतर ठेवण्याच्या सूचना एअरलाईन्सना देण्यात आल्या आहेत.

Air India Opens their domestic flights booking from forth may

loading image
go to top