Covid19 - मुंबईत तीन ट्रक तब्बल भरून 'एवढे' लाख मास्क जप्त...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतेय. अशात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही जणांनी मास्कचा काळाबाजार करण्यास सुरूवात केली

मुंबई - मुंबईच्या गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी तीन ट्रक भरून मास्क हस्तगत केले आहेत. तब्बल अंदाजे  26 लाख मास्क पोलिसांनी हस्तगत केले आहेत. काळाबाजार करण्यासाठी हे मास्क आणल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. बाजारात या मास्कची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखा 9 ला भेट देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत पोलिसांचे कौतुक केले. त्यावेळी सोबत पोलिस आयुक्त परमबिर सिंह ही सोबत होते. 

मोठी बातमी - मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतेय. अशात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही जणांनी मास्कचा काळाबाजार करण्यास सुरूवात केली. हवे त्या किंमतीला ही टोळी मास्क विकत होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखा 9 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली देसई यांच्या पथकाने अंधेरीत कारवाई केली. पोलिस कारवाईत त्यांना तीन ट्रकभरून मास्क आढळून आले.

तब्बल 26लाखा हे मास्क असून बाजारात या मास्कची किंमत १५ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी भिवंडी आणि सहार येथे अखिल आणि गुलाम वेअर हाऊस अशा तीन ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

बालाजी नाडर (36), शाहरूख शेख(23), मिहिर पटेल (36),गुलाम मुन्शीर (30) अशी या आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः गुन्हे शाखेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पोलिस आयुक्त परमबिर सिंग हे देखील उपस्थित होते.

26 lacs corona mask woth 15 crore seized by mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 lacs corona mask woth 15 crore seized by mumbai police