26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai Attackesakal

26/11 Mumbai Attack:  26/11 हल्ल्याची काळी रात्र, वाचा NSG कमांडोचा थरारक अनुभव

आजही ही तारीख आठवली की त्या जखमा ताज्या होतात

26/11 Mumbai Attack:  

26/11 असं एखाद्याला झोपेत जरी विचारलं तरी त्याला सांगता येईल की त्या दिवशी मुंबईत काय घडलं होतं. 2008 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आठवून लोक अजूनही घाबरतात. 26/11 च्या घटनेने संपूर्ण देश हादरला. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईला रक्तरंजीत करून टाकलं.

मिसरुडही न फुटलेल्या या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 160 हून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्या घटनेने जितके लोक जखमी झाले तितक्याच जखमा हे सगळं प्रत्यक्षात आणि टिव्हीवर पाहणाऱ्यांच्या मनावरही झाल्या. आजही ही तारीख आठवली की त्या जखमा ताज्या होतात.

26/11 Mumbai Attack
26/11 हल्ला : नांगरे पाटलांच्या बॉडीगार्डला बाहेर आणणारे जगदेवप्पा झाले PSI

या हल्ल्याला पोलिसांनीही सडेतोड उत्तर दिले. मुंबई पोलिसांच्या हल्ल्यात 9 दहशतवादी मारले गेले. तर एक दहशतवादी अजमल आमिर कसाब जिवंत पकडला गेला. दहशतवाद्यांचा खात्मा करणार्‍या NSG टीमचा भाग असलेले कमांडो शेखर विनोद (नाव बदलले आहे) यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या या दृश्याचे वर्णन केले आहे.

माजी NSG कमांडो शेखर विनोद यांनी सांगितले की 26/11 चा दहशतवादी हल्ल्यावेळी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने एनएसजीचे पथक मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उतरवण्यात आले. ताज हॉटेलमध्ये दाखल झालेल्या संघात त्याचा समावेश होता. 26/11 च्या ऑपरेशनमध्ये नागरिकांचे प्राण वाचवणे हे त्यांचे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

26/11 Mumbai Attack
Republic Day : विराट कोहलीचे 26 जानेवारीशी आहे खास नाते; 11 वर्षापूर्वी...

ताज हॉटेलच्या छतावर उतरल्यानंतर मी खाली पोहोचलो, तेव्हा तिथे मला एक मोबाइल सापडला. मोबाईल उचलल्यानंतर मी खाली उतरलो तेव्हा त्याचा सामना दहशतवाद्यांशी झाला. दहशतवादी थेट गोळीबार करत होते.  तेव्हा आम्हीही त्यांना प्रत्युत्तर देत होतो. हॉटेलमध्ये दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

शेखर विनोद यांनी सांगितले की, दहशतवादी बातम्यांद्वारे आम्हाला ट्रॅक करत होते. याची अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली, त्यानंतर या ऑपरेशनचे लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्यात आले.  त्यांचे ऑपरेशन खूप वेळ सुरू होते, ज्यामध्ये ताज हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या 9 दहशतवाद्यांना एनएसजी टीमने ठार केले होते.  या कारवाईत एका NSGच्या मेजरसह दोघे जण शहीद झाले होते.

26/11 Mumbai Attack
26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या प्रत्यार्पणाच्या हालचाली वाढल्या, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची मोठी माहिती

नक्की काय घडलं होतं

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री अजमल कसाबसोबत इतर दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईच्या जवळ आले. त्यानंतर त्यांनी एका कोळी बांधवाची बोट ताब्यात घेऊन त्यांची हत्या केली. त्या बोटीने ते मुंबईत आले. त्यानंतर ते छोट्या ग्रूपमध्ये विखुरले गेले आणि त्यांनी काही ठिकाणी हल्ला करायला सुरूवात केली.

मुंबईतील ओबेरॉय आणि ताज हॉटेल्स, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नरीमन हाऊस यांवर अचानक फायरिंग सुरू केले होते. अनेक तास चाललेल्या या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. तसेच अनेक नागरिक आणि पोलिसांनाही विरमरण आले.

26/11 Mumbai Attack
Mumbai Attack: 26/11 च्या हल्ल्याशीच नाही तर पुण्याच्या जर्मन बेकरीशीही आहे डेव्हिड उर्फ दाऊदचं कनेक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com