रुग्णालयांना एसटीची सेवा परकी 

st
st

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंन्ट हेल्थ स्कीम (सीजीएचएस)अंतर्गत केवळ 17 रुग्णालयांनी पुढाकार घेतला असून त्यात मुंबईतील एकाही रुग्णालयाचा समावेश नसल्याची माहिती एसटीने जारी केलेल्या परिपत्रकातून उघडकीस आली आहे. त्याशिवाय कर्करोग, हृदयविकार आदी गंभीर आजारांवर उपचार करणाऱ्या पाच रुग्णालयांनी योजनेतील दरानुसार उपचार करण्यासाठी असहमती दर्शवली आहे. 

महामंडळात कार्यरत असलेल्या एसटी कर्मचारी, अधिकारी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजार असल्यास त्यांना "सीजीएचएस'च्या दराने आरोग्य सुविधा देण्याचा एसटीचा उपक्रम आहे. त्यासाठी राज्यासह परराज्यातील रुग्णालयांना एसटी महामंडळाचे प्रस्ताव पाठवले जाते. त्यानुसार रुग्णालयाशी करार केला जातो. वेळोवेळी कराराचे नूतनीकरण केले जाते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 48 रुग्णालयांपैकी केवळ 17 रुग्णालयांनी "सीजीएचएस'च्या दराने उपचार देण्यास सहमती दर्शविली आहे. तर सुमारे 31 रुग्णालयांनी असहमती दाखवली असल्याने आरोग्यसेवा खोळंबली आहे. 

या योजनेतून हृदयविकार, मूत्रपिंड, कर्करोग आदी आजारांवर सीजीएचएसच्या दराने उपचार केले जातात. मात्र, यापूर्वी परराज्यातील रुग्णालयामध्ये ही उपचार घेता येत होते. मात्र, यावेळी चेन्नई, नवी दिल्ली, वेल्लोर, त्रिवेंद्रम, चेन्नई, कोलकाता, चंदिगड, भोपाळ या राज्यातील रुग्णालयांना एसटी महामंडळाने सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे राज्यातील 17 रुग्णालयांमध्येच आता एसटीच्या कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार घ्यावा लागणार आहे. 
 

विभाग नियंत्रकांवर कारवाई 
मुंबई, पुणे, सोलापूर, अकोला येथील विभाग नियंत्रकांना त्यांच्या विभागातील गंभीर आजारावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांच्या भेटी घेऊन "सीजीएचएस'च्या दराने उपचार देण्याचे प्रस्ताव द्यायचे होते. मात्र, या विभागातील विभागीय नियंत्रकांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्याच्यांवर कारवाई करण्यासाठी स्पष्टीकरण मागितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com