राणीच्या बागेतील ३२ प्राण्यांचा मृत्यू : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण

सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा लेखाजोखा मांडला आहे
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : सन २०१९-२० या एका वर्षात वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) तब्बल ३२ विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आपल्या अहवालात ही नोंद केली आहे.

राणीच्या बागेतील २०१९-२० चा वार्षिक अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्रसिद्ध केला आहे. त्यात पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यानुसार वर्षभरात आठ पक्षी, १७ सस्तन प्राणी आणि ३० सरपटणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. मृत झालेल्या सस्तन प्राण्यांमध्ये हरण, नीलगाय, सांबर, मॅकाक रिसस यांचा समावेश आहे, तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ३० गोड्या पाण्यातील कासवांचा समावेश असून, आठ विविध पक्षी मृत झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Mumbai
भाजपने वर्षभरात पाच मुख्यमंत्री बदलले; झारखंड निवडणुकीतून घेतला धडा?

सध्या राणीच्या बागेत ६५ सस्तन, ३४ सरपटणारे, तर १७३ प्रकारचे पक्षी शिल्लक आहेत. अहवालातील आकडेवारीनुसार बागेत एकूण ३०५ प्राणी होते. त्यातील ३२ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. २७२ प्राणी शिल्लक आहेत. १८ प्राण्यांचा बागेत जन्म झाला असून, २२ प्राण्यांना रेस्क्यू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com