... अबब, 35 किलोचा जिताडा जाळ्यात! तब्बल एवढ्या रुपयांना विक्री! वाचा

... अबब, 35 किलोचा जिताडा जाळ्यात! तब्बल एवढ्या रुपयांना विक्री! वाचा


उरण : खोपटा भेंडखळ समुद्री खाडीत अरूण ठाकूर या मच्छीमाराने वाणा लावल्या होत्या. त्या वाणेला तब्बल 35 किलो वजनाचा जिताडा मासा मिळाल्याची घटना रविवारी घडली आहे. हा जिताडा मासा 35 हजाराला विकला गेला आहे.

जिताडा हा रायगडचा सर्वांत प्रसिद्ध मासा म्हणून ओळखला जातो. याच जिताडा माशाचा सर्वांत मोठा मासा  उरणच्या भेंडखळ गावातील मच्छीमाराला मिळाला आहे. मासेमारी अनेक प्रकाराने करता येते. त्यातील एक प्रकार म्हणजे वाणा. रविवारी पहाटे अशाच प्रकारे लावण्यात आलेल्या वाणा प्रकारच्या मासेमारीत तब्बल 35 किलो वजनाचा जिताडा मासा भेंडखळ येथील अरूण ठाकूर यांना मिळाला आहे. हा मासा माणसाच्या उंची एवढा असल्याचे समोर आले आहे. 

आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा

ठाकूर यांना अनेक महिने कामधंदा नव्हता. मासळीही फारशी मिळत नव्हती. आज मिळालेल्या जिताडा माशामुळे ठाकूर यांना अच्छे दिन आले आहे. करंजा गावातील एका व्यक्तीने सुमारे 35 हजार रुपयांना हा जिताडा मासा विकत घेतला आहे.

वाणा म्हणजे काय?

खाडीकिनारी सुमारे एक ते दोन किमीच्या परिघात काठ्या गाडून त्याला जाळ बांधले जाते. पूर्ण भरती आल्यावर जाळ समुद्राच्या बाजूने काठीच्या उंचीवर उभे केले जाते. त्यामुळे जाळ आणि किनारा यांच्यामध्ये अडकलेली मासळी या वाणा प्रकारच्या खाजणी मासे पकडणीत मिळत असते.

मासळीचा राजा जिताडा, अनेकांची पहिली पसंत
रायगड जिल्ह्यातील जिताडा मासा म्हणजे अगदी पापलेट, हलव्यालाही बाजूला ठेवणारा मासा म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी तर पैशाने जी कामे होत नव्हती, ती या जिताडा माशाने अगदी सहज होत होती. राज्याच्या अनेक मंत्र्यांना जिताड्याची उत्सुकता असायची. जिताड्याच्या भेटीने अनेक कामे करून घेतल्याची उदाहरणे जुने राजकारणी सांगतात. शरद पवार यांचाही जिताडा हा आवडीचा मासा आहे. ते उरण अथवा अलिबागला आल्यावर आजही जिताडा खाल्ल्याशिवाय त्यांचा दौरा पूर्ण होत नाही, से म्हटले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com