esakal | काय सांगता ! एका दिवसात चक्क इतक्या कोटींची दारु विक्री

बोलून बातमी शोधा

alcohol sale

काही जिल्ह्यांतील मद्यविक्री पुन्हा बंद करण्यात आल्यामुळे देशी मद्याची 75 व विदेशी मद्याची 364 दुकाने; तसेच 137 बिअर शॉप बंद आहेत. 

काय सांगता ! एका दिवसात चक्क इतक्या कोटींची दारु विक्री
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात 4 एप्रिलला मद्यविक्री सुरू करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (ता. 86) एकाच दिवशी 12.50 लाख लीटर म्हणजे 43.75 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. एकूण 36 जिल्ह्यांपैकी फक्त 18 जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री होऊ शकली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अन्य जिल्ह्यांत मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये लवकरच मद्यविक्री सुरू होण्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले.

मोठी बातमी ः कर्मचारी हवालदिल, पालिका प्रशासन अडचणीत; कोरोना संकटांत कसा सोडवणार हा तिढा

राज्यातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर हे दारूबंदी जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सशर्त मद्यविक्री सुरू झाली आहे. लॉकडाऊनदरम्यान शेजारील राज्यांतून होणारी मद्यतस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व विभागीय उपायुक्त व अधीक्षकांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. एकूण 12 सीमा तपासणी नाक्यांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी मंगळवारी राज्यात 121 गुन्हे नोंदवून 62 आरोपींना अटक केली आणि 29.80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

मोठी बातमी ः चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार

काही जिल्ह्यांतील मद्यविक्री पुन्हा बंद करण्यात आल्यामुळे देशी मद्याची 75 व विदेशी मद्याची 364 दुकाने; तसेच 137 बिअर शॉप बंद आहेत. 

मोठी बातमी ः धक्कादायक! : आता आर्थर रोड कारागृहातही कोरोनाचा प्रवेश

या जिल्ह्यांत दारूची दुकाने खुली
ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, बुलडाणा, नाशिक, यवतमाळ, अकोला, वाशिम. 

या जिल्ह्यांत दारूची दुकाने बंद
सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, गोंदिया.

मद्यविक्री सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद
मुंबई शहर, मुंबई उपगनर, उस्मानाबाद, लातूर.

सध्याची स्थिती -
प्रकार  -  एकूण दुकाने  -  सुरू दुकाने

  • देशी मद्य, किरकोळ विक्री - 4159 - 1036
  • विदेशी मद्य - 1685 - 354  
  • बियर शॉप - 4947 - 1576 
  • वाईन शॉप - 31 - 1

 43.75 crore liquor sales in a single day in the maharashtra state