एपीएमसी निवडणुकीसाठी 58 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी मतदान होत असून, निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 123 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार संचालक पदासाठी आणि महसूल विभागासाठी निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी मतदान होत असून, निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 123 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 29 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 

ही बातमी वाचली का? अनधिकृत नर्सिंग होमवर विधीमंडळात लक्षवेधी

बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सहा महसूल विभागात आणि पाच बाजार समित्या आणि व्यापारी हमाल माथाडी प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींच्या एका जागेकारिता ही निवडणूक होत आहे. यात व्यापारी हमाल माथाडी या विभागातून शशिकांत शिंदे; तर फळ बाजारातून संजय पानसरे या दोघा उमेदवारांनीच अर्ज भरल्याने या दोन जागांवर त्यांची बिनविरोध निवडणूक झाली आहे. मात्र, सहा महसुली आणि पाच समिती संचालकांकरिता थेट लढत होणार आहे.

ही बातमी वाचली का? त्या फिलीपाईन्सच्या नागरिकाला कोरोना नाही

कांदा बटाटा बाजारात यावेळी अशोक वाळुंज, सुरेश शिंदे आणि राजेंद्र शेळके यांच्यात तिरंगी लढत होणार आहे; तर मसाला मार्केटमध्ये विजय धुता, अशोक राणावत आणि कीर्ती राणा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अन्नधान्य बाजारात नीलेश वीरा, पोपटलाल भंडारी आणि लक्ष्मीदास भानुशाली यांच्यातही तिरंगी लढत आहे. भाजीपाला बाजारात शंकर पिंगळे, के. डी. मोरे, प्रताप चव्हाण आणि आप्पासाहेब शिरकर यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय इतर सहा महसुली विभागांतून अमरावती- 7, नागपूर- 7, नाशिक- 8, कोकण- 5, औरंगाबाद-11 आणि पुणे विभागातून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 

ही बातमी वाचली का? मुंबई यंदाही तुंबणार
 
एपीएमसी निवडणुकीसाठीच्या एकूण 18 जागांसाठी 181 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 
- शामकांत साळुंखे, सहायक निवडणूक अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 58 candidates for vashi APMC elections