61 वर्षीय महिलेने केले अवयवदान; दोन रुग्णांना मिळाले जीवदान...

mission organ donation
mission organ donation

मुंबई : मुंबईतील एका 61 वर्षीय महिलेने यकृत आणि मूत्रपिंडाचे अवयवदान करुन दोघांचा जीव वाचवला आहे. जिवंतपणीही इतरांना मदत करणाऱ्या या महिलेने मरणानंतरही दोघांचे प्राण वाचवून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मरणानंतरही इतरांना मदत व्हावी, अशा हेतूनेच अवयवदान करण्यात आले असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. 

हायपोथायरॉईडीझमग्रस्त 61 वर्षीय रुग्ण महिलेला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये 22 जून रोजी दाखल करण्यात आले. त्यांना डोकेदुखी, उलट्या आणि बेशुद्धी अशी गंभीर तक्रारी होत्या. ब्रीच रुग्णालयाचे सहयोगी वैद्यकीय संचालक डॉ. सुनील बांदेकर यांच्या म्हणण्यानुसार रुग्णाची त्वरीत सीटी स्कॅन करण्यात आले. यातून त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट दिसून आले. उपचार करुनही आगामी 24-36 तासांत त्यांच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. 24 जून रोजीच्या पहिली श्वसनक्रिया चाचणी आशादायी होती. मात्र, पुन्हा 6 तासांनंतर घेण्यात आलेली दुसरी श्वसनक्रिया चाचणी मेंदूमृत असल्याचे स्पष्ट होत होते. 

त्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या रविना यांना माहिती देण्यात आली. रविना यांनी नातेवाईकांना सल्ला देत रुग्णाची स्थिती पाहता अवयवदानाबाबत सुचवले.  ब्रीच कँडी रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. गीता कोप्पिकर यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबियांनी अवयवदानासाठी त्वरित सहमती दर्शवली.  विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला तसेच मुख्य समन्वयक उर्मिला महाजन यांना कळवण्यात आले. त्यानुसार, उर्मिला यांनी अवयव प्राप्तकर्त्यांची नोंद सांगितली. 

सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने कोविड-19 शी संबंधित मार्गदर्शकतत्त्वे पूर्ण करण्यात आली असल्याचे उर्मिला महाजन यांनी सांगितले. तर, झेडटीसीसीचे जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शहा यांनी सांगितले की, डॉक्टर, समाजसेवक आणि ब्रीच कँडी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने अवयवदानास पुरक अशा त्वरीत हालचाली केल्या. तर झेडटीसीसीचे सहसचिव डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, “ब्रीच कँडी रुग्णालयाचे व्यवस्थापन असावे नि: स्वार्थपणे अवयवदानाची देणगी दिली गेली आणि यामध्ये अनेकांचे जीव वाचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे.

1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

'जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की माझी पत्नी ब्रेनडेड आहे, तेव्हा आम्हाला तिच्या अवयवांचे दान करण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला. माझ्या पत्नीने नेहमीच इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आता तिचे अवयवही इतरांना मदतीचे ठरतील, असा निर्णय कुटुंबांच्या सहमतीने घेतला. आम्ही आशा करतो की इतरही अवयवदान करण्याचा विचार करतील.'
-अवयवदात्रीचा पती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com