मुंबईवरील कोरोनाचे संकट गडद; दिवसभरात 769 रुग्णांची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

मुंबईतील कोव्हिड-19 विषाणूग्रस्तांची संख्या वाढतच असून, बुधवारी 769 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची संख्या 10,527 झाली आहे.

मुंबई: मुंबईतील कोव्हिड-19 विषाणूग्रस्तांची संख्या वाढतच असून, बुधवारी 769 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची संख्या 10,527 झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी झालेल्या 215 जणांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. आणखी 159 रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 2287 वर गेली आहे. 

मोठी बातमी ः धक्कादायक! : आता आर्थर रोड कारागृहातही कोरोनाचा प्रवेश

मुंबईत कोरोनाची 635 नवे रुग्ण आढळले आणि 15 पुरुष व 10 महिला अशा एकूण 25 बाधितांचा मृत्यू झाला. या 25 जणांपैकी 19 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 12 रुग्ण 60 वर्षांवरील, 12 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील, तर एक रुग्ण 40 वर्षांखालील होता. मुंबईतील कोरोनाबळींचा आकडा आता 412 झाला आहे. 

मोठी बातमी ः कर्मचारी हवालदिल, पालिका प्रशासन अडचणीत; कोरोना संकटांत कसा सोडवणार हा तिढा

मुंबईत 769 नवे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 10,527 वर पोहोचली. त्यापैकी 554 रुग्ण बुधवारी आढळले, तर 215 रुग्ण 2 ते 4 मे या काळात रुग्णालयात दाखल झाले होते. एकूण 443 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 12,749 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

मोठी बातमी ः चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार

दरम्यान, मुंबईतील जी उत्तर विभागात बुधवारी दिवसभरात 87 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी धारावीत सर्वाधिक 68 रुग्ण आढळले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीत सापडलेल्या 68 रुग्णांमध्ये 43 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश असून, बाधितांची एकूण संख्या 733 झाली आहे. नाईक नगरमधील 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 21 वर गेला आहे. माहीममध्ये 11 नवे रुग्ण आढळल्यामुळे बाधितांची संख्या 91 झाली. दादरमध्ये आणखी 8 नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण आकडा 64 वर गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 769 new corona positive patients found in mumbai