Rare Species Turtle: वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत मिळाला दुर्मिळ कासव

Rare Species Turtle vasai
Rare Species Turtle vasai sakal

Rare Species Turtle: वसई च्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ जातीचा कासव मृतावस्थेत आढळला आहे.आज शनिवार ता 20 रोजी समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांना हा कासव।मृतावस्थेत आढळून आला आहे. वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानी त्याला ताब्यात घेऊन, त्याचा रीतसर किनाऱ्यावरच अंत्यविधी केला आहे.

Rare Species Turtle vasai
Olive Ridley Turtle : मुरूडनंतर दापोली समुद्रकिनारी आढळले ऑलिव्ह रिडले कासवांचे 80 अंड्यांचे घरटे

वसई तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. वसई सुरुची बाग, कळंब, राजोडी, अर्नाळा या समुद्र किनार्यावर मोठं मोठे डॉल्फिन मासे, दुर्मिळ जातीचे कासव हे मृतावस्थेत आढळून येत असतात. समुद्रात मृत झाल्या नंतर भरतीच्या पाण्याने ते समुद्र किनाऱ्याला लागत आहेत. पण हे दुर्मिळ।मासे, कास का आणि कशामुळे मरत आहेत याचा मात्र आणखी शोध लागला नाही.

Rare Species Turtle vasai
Crocodile, turtle survey : पेंचमध्ये आढळले ३० कासव; दुर्मिळ पानमांजराचेही अस्तित्व

आज शनिवारी सापडलेला कासव हा दुर्मिळ असून 100 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज वर्तविला असून, तो 3 फूट लांब, अर्धा फूट उंच असा आहे. तो मृत झाला असल्याने तो फुगलेला ही होता. समुद्रातील जहाजाची त्याला जोराची धडक लागल्याने किंवा समुद्रातील एकाद्या केमिकल मुले त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

समुद्र किनाऱ्यावर आम्ही सकाळी फिरायला गेलो असता हा मृतावस्थेत कासव आम्हाला दिसला. आम्ही तात्काळ महापालिकेला याची माहिती दिली असता, त्यांनी त्याला ताब्यात घेऊन अंत्यविधी केली आहे. पण समुद्रातील दुर्मिळ कासव मृत अवस्थेत मिळणे ही चिंतेची बाब असून, पर्यावरणासाठी धोक्याचा इशारा आहे असे पर्यवरणप्रेमी रॉबर्ट रोड्रिंक्स यांनी सांगितले आहे.

Rare Species Turtle vasai
Turtle Conservation : कासवांना नवसंजीवनी; दिवेआगारमध्ये वनविभागाकडून संवर्धन मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com