चढ्या दराने वस्तू विक्री कराल तर..., तहसीलदारांचा विक्रेत्यांना कारवाई इशारा

grossry
grossry

पाली : शहरातील काही किराणा मालाच्या दुकानांतून वाढीव भावाने वस्तू विकल्या जात असल्याच्या तक्रारी सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे आल्या होत्या. तसेच याबाबत समाजमाध्यमांवर सरसकट व्यापाऱ्यांना ट्रोल केले जात होते. त्यामुळेच चढ्या भावाने विक्री करणारे व्यापारी आणि विनाकारण व्यापाऱ्यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.

याबाबत पाली व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात झाली. या वेळी तालुक्यातील ग्राहकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य नागरिकांसह अनेक व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. आदी बाबींचा विचार करून तालुक्यातील किराणा मालाच्या दुकानदारांनी कुठल्याही वस्तूंची साठेबाजी करू नये तसेच कुठल्याही ग्राहकाकडून वस्तूचे वाढीव दर घेऊ नये, असे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात प्रमुख वस्तूचे भाव फलक लावणे आदी सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे तालुका स्तरावर एक पथक नेमून पाली शहरातील किराणा दुकानांची तपासणी करण्यात येईल, असे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार डी. एस. कोष्टी, पुरवठा निरीक्षक सौ. डाकी, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आलाप मेहता, इंद्रमल परमार, अशोक ओसवाल, राजेंद्र मेहता, विक्रम चौधरी, यांच्यासह विनोद भोईर, रवींद्रनाथ ओव्हाळ, संतोष उतेकर, गौसखान पठाण आदींसह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पाली व्यापारी असोसिएशनचे नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोना महामारी अशावेळी त्यांचे शासनाला सहकार्य असते; मात्र सर्वसामान्य ग्राहकांची कोणत्याही दुकानातून लूट होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई नक्कीच करण्यात येईल. तसेच ग्राहकानेदेखील व्यापारयाबद्दल चुकीचे मेसेज करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड 

Action against those who sell goods at inflated prices Pali, tehsildar Dilip Rayannawar's warning

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com