सांताक्रूझमधील ११० अतिक्रमणांवर कारवाई

सांताक्रूझमधील ११० अतिक्रमणांवर कारवाई

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच मुंबई महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग सक्रिय झाला आहे. महापालिकेने धडक कारवाई करत सांताक्रूझ येथे तानसा जलवाहिनीलगतची ११० अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे जलवाहिनीलगतचा ५०० मीटरचा भाग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील सांताक्रूझ पूर्व भागातील तानसा जलवाहिनीलगत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. अनधिकृत बांधकामांमुळे जलवाहिनीची सुरक्षितता धोक्‍यात आली होती; तसेच जलवाहिनी फोडून पाणीचोरीची शक्‍यताही निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने जलवाहिनीलगतची अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेऊन पाच दिवसांपासून कारवाई सुरू केली. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहील असे सांगण्यात आले.

परिमंडळ क्र. ३ चे उपायुक्त पराग मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एच-पूर्व विभागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई पोलिस दलातील १०० कर्मचाऱ्यांची विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती. कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकात १०० कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश होता. या कारवाईत चार जेसीबी, पाच डंपर वापरण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com