esakal | फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईला मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

नौपाडा परिसरात साऱ्यांचे लक्ष

फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईला मुहूर्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महापौर नरेश म्हस्के यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सक्त आदेश महापालिका प्रशासनाला सोमवारी दिले होते. त्यानंतर चार दिवसांनी नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना जाग येऊन काही प्रमाणात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पण ही कारवाई किती दिवस चालणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

"डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

ठाण्यातील पदपथ व रस्ते हे नागरिकांसाठीच आहेत, ते कायमस्वरूपी मोकळे असलेच पाहिजे, यापूर्वी देखील मी भूमिका मांडली आहे व त्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली होती. महापालिकेच्या जनसंवाद उपक्रमात त्यांनी ही भूमिका घेतली होती. माझ्याविरोधात फेरीवाला संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलने केली; तसेच माझे पुतळे जाळले तरी चालेल; पण या फेरीवाल्यांवर कारवाई करा, असे आवाहन महापौरांनी केले होते. पण त्यानंतरही फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाईबाबत प्रशासन ढिम्म असल्याचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना घ्यावा लागला होता.

पाकिस्तानी एजंटचा ई-मेल, ७ जण भारतात करणार दहशतवादी हल्ला...

तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात फेरीवाल्यांवर प्रशासनाचा वचक होता. त्यावेळी शहरातील गर्दीसह प्रामुख्याने रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान बसविले जात नव्हते. त्याचबरोबर मनसेचे आंदोलन झाल्यानंतर काही काळ रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले फिरकत नव्हते. पण स्थानिक पातळीवर प्रभाग समितीकडून या फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित असते. त्यातही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याचा दावा करून फेरीवाल्यांच्या पुढाऱ्यांनी शहरातील सर्व रस्ते आपल्याच मालकीचे रस्ते असल्याच्या थाटात सर्वत्र बस्तान बसविले आहे. पण मुळात रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यावर फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी नाही.

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहिर

तसेच पदपथ अडविण्याची परवानगीही नाही. पण त्यानंतरही फेरीवाल्यांनी शहरातील अनेक रस्ते अडविले आहेत. त्यांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने काही प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही फेरीवाल्यांच्या गाड्याही तोडण्यात आल्या आहेत. पण किमान रेल्वेस्थानक परिसरातील कारवाई किती दिवस तग धरणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.