आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना दिली आनंदाची बातमी! कोरोनाला रोखण्यात येतंय यश?

आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना दिली आनंदाची बातमी! कोरोनाला रोखण्यात येतंय यश?
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरसचा अजूनही कहर सुरुच आहे. मुंबईत या व्हायरसचा  सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्यांही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईनं कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनच्या वुहान शहरालाही मागे टाकलं आहे. दरम्यान मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी समोर येतेय. मुंबईत रुग्णांच्या आकडा उच्चांकीवर गेला असताना रुग्ण दुप्पटीच्या कालावधीत घट झाल्याची माहिती मिळाली आहे. तसंच मृत्यूदरातही घट झाल्याचं समजतंय. खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली. ट्विट करुन आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

ट्विटमध्ये त्यांनी महापालिका आयुक्तांकडून एक चांगली बातमी असं लिहिलं आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी झाला आहे. आता डबलिंग रेट 24.5 इतका आहे. राष्ट्रीय सरासरी 16 दिवस इतकी आहे.मृत्यूदरही कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मृत्यूदर 3 टक्के इतका झाला असून राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास आहे. तर, डिस्चार्ज रेटही 44 दिवस इतका असून धारावीतील डबलिंग रेट 42 दिवस झाला आहे. 

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्यावर गेला आहे. मुंबईत जून महिन्यात दररोज सरासरी 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यातील पहिल्या 9 दिवसांत दरदिवशी सरासरी 53 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झालेत. जून महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पहिल्या 9 दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 41 होतं. त्यामुळे  मे महिन्याच्या तुलनेत जुनमध्ये कोरोनामुळं होणाऱ्या मृतांचे प्रमाणं 30 टक्क्यांनी वाढलं आहे.  

जून महिन्यात मुंबईत 481 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, 1 जूनला 40 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. 1 जूनपासून पुढच्या 3 दिवसांत 50 जणांचा मृत्यू झाला. या आठवड्यात मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यूनं उच्चांकी गाठली. सोमवारी तब्बल 64 जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com