Viral Video: 'अदित्य ठाकरे, गॅस सिलिंडरला मत द्या,' वंचित'च्या कार्यकर्त्यांचे आवाहन; पुढे काय झाले पाहा

Aditya Thackeray: अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमदार अदित्य ठाकरे यांच्यात काय झाले, हे पाहायला मिळत आहे.
Aditya Thackeray Vanchit Bahujan Aghadi Workers
Aditya Thackeray Vanchit Bahujan Aghadi WorkersEsakal

सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आतापर्यंत देशासह महाराष्ट्रात चौथ्थ्या टप्प्यांचे मतदान झाले आहे. महाराष्ट्रात आता फक्त नाशिक मतदारसंघ आणि मुंबई परिसरातील जागांवर मतदान राहिले आहे.

अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमदार अदित्य ठाकरे यांना गॅस सिलिंडरला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

Aditya Thackeray Vanchit Bahujan Aghadi Workers
"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

यावेळी एका एक्स युजरने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, "शिवसेना नेते अदित्य ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील आपुलकीचा संवाद."

दरम्यान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथिल प्रतिक्षा नगरमधून अदित्य ठाकरे आपल्या चारचाकीतून निघाले होते. त्यावेळी अदित्य यांची गाडी काही क्षण थांबली असता 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी त्यांना गॅस सिलिंडरला मतदान करा असे सांगितले.

पुढे अदित्य यांनी आपल्या गाडीतूनच या कार्यकर्त्यांशी हस्तलोंदन केले आणि पुढे निघाले.

Aditya Thackeray Vanchit Bahujan Aghadi Workers
Ghatkopar Hoarding Collapse Update: 'ते' १४ जणांचा जीव घेणारे होर्डिंग बेकायदेशीर; BMCने दिली माहिती

दरम्यान मुंबई परिसरातील लोकसभेच्या पाच जागांवर महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.

शिवसेना फुटल्यानंतर येथे पहिल्यांदाच मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार होणार आहे. यात शंक नाही. याचबरोबर येथे महायुतीतून भाजपचे तर महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षाचे उमेदवारही रिंगणात आहे.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही मैदानात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com