

Metro 11 Extension
ESakal
मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगर भागातील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेनंतर आता मेट्रो विस्तार प्रकल्पाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मुंबई मेट्रो-११ च्या विस्तारासाठी प्राथमिक भूमिगत सर्वेक्षण सुरू करणार आहे. मेट्रो प्रशासनाने या कामासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. मुंबई मेट्रो-११ (ग्रीन लाईन) हा अनिक डेपोला गेटवे ऑफ इंडियाशी जोडणारा एक भूमिगत मार्ग आहे.