मुरबाडमध्ये कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर प्रशासनाने राबवली 'ही' उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

मुरबाड तालुक्यातील व्यापारी 25 वर्षे तालुक्याबाहेर रहात होते. ते 18 मे रोजी गावात येऊन गेले होते. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

सरळगाव : मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली या गावात पाहूणा म्हणून आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड तालुक्यात कोव्हिड केअर सेंटर सज्ज करण्यात आले आहे. या ठिकाणी 150 ते 200 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तहसिदार अमोल कदम कदम यांनी दिली.

महत्वाची बातमी : संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

मुरबाड तालुक्यातील व्यापारी 25 वर्षे तालुक्याबाहेर रहात होते. ते 18 मे रोजी गावात येऊन गेले होते. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 22 जणांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड-बदलापूर रोडवरील शांती सेवा निधी ट्रस्टतर्फे 92 खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्याचे ट्रस्टचे संचालक अमर माने यांनी सांगितले.

नक्की वाचा : एसटी कामगारांची इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' औषध द्या..महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं केली मागणी    

तहसिदार अमोल कदम, गटविकास अधिकारी आवचर व वैद्यकीय अधिकारी डॉ.बनसोडे यांनी या सेंटरची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून परीसरही स्वच्छ करण्यात आला आहे. या ठिकाणी 150 ते 200 खाटा तयार करून ठेवण्यात आल्या आहेत.

administration implemented measure after the death of Corona victims in Murbad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administration implemented measure after the death of Corona victims in Murbad