
मुंबई, ता. 24 : एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुला प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसायिक प्रवेशाच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळावा यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर गेली आहे.
सीईटी सेलमार्फत फार्मसी, अभियांत्रिकी, एमसीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एम ई, एलएलबी अशा विविध अभ्यासक्रमच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सेलने ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीही तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास आठवड्याभराची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार 25 डिसेंबर दरम्यान यातील अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीची मुदतवाढ संपुष्टात येत असल्याने आणखी काही दिवस मुदत वाढवून देऊन एसईबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.
या महत्त्वाच्या बातम्याही वाचा :
( संपादन - सुमित बागुल )
Admission process vocational courses has been extended again
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.