#कोरोनायोद्धा : तब्बल ३ महिन्यानंतर पितापुत्राची भेट, पोलिसानं बजावलं पहिलं कर्तव्य

police
police

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना व्हायसरचा मुंबईत जास्त प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना दिसताहेत. यात पोलिस, डॉक्टर, नर्स पालिका कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही सेवा बजावाहेत. अत्यावश्यक सेवा बजावताना अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली. अशातच एका पोलिसानं कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर या पोलिसानं आपल्या नवजात बालकाची भेट घेतली आहे. 

धारावी पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक प्रमोद माने यांच्या पत्नीनं २३ मार्च रोजी सांगलीत एका गोंडस बाळाला जन्म दिला. देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी त्यांची प्रसूती झाली. पितृत्व रजेसाठी अर्ज करण्याचा त्याच्याकडे पर्याय होता मात्र माने यांनी पहिलं आपलं कर्तव्य बजावलं. एप्रिल महिन्यात धारावी हे कोरोना व्हायरससाठी हॉटस्पॉट ठरला होता. त्यासाठी माने हे आपलं कर्तव्य बजावण्यासाठी मुंबईतच थांबले. २८ एप्रिलला माने यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माने हे आपल्या कुटुंबियांच्या वारंवार संपर्कात होते. मात्र त्यांनी व्हिडिओ कॉल करणं टाळलं, कारण त्यांनी आपल्या कुटुंबियांना रुग्णालयात असल्याचं सांगायचं नव्हतं. 

माझ्या कुटुंबाला संसर्ग होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. मी जर त्यांना मला कोरोनाची लागण झाली असं सांगितलं असतं, तर त्यांनी मुंबईत येण्याचा प्रयत्न केला असता, असं माने यांनी सांगितलं. माने यांच्या कुटुंबियांमध्ये आई-वडिल, सात वर्षांची मुलगी, पत्नी आणि नवजात मुलगा यांचा समावेश आहे. माने यांनी कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आणि 11 मे रोजी त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. 20 मे रोजी माने  पुन्हा ड्युटीवर रुजू झाले आणि त्यानंतर 16 जूनला ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सांगलीला रवाना झाले. तब्बल तीन महिन्यानंतर त्यांनी आपल्या बाळाला हातात घेतलं. 

धारावीचे वरिष्ठ निरीक्षक रमेश नांगरे यांनी माने यांनी बजावलेल्या कर्तव्याचं कौतुक केलं आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही ते आपल्या बाळाला बघण्यासाठी आपल्या घरी न जाता पुन्हा कामावर रुजू झाले. त्यांनी पुन्हा कंटेन्मेंट झोनमध्ये काम करण्यास सुरुवात केली, असं धारावीचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितलं. कुटुंबासमवेत दहा दिवस घालवल्यानंतर माने यांनी 26 जून रोजी पुन्हा कामाला सुरुवात केली.

after 3 months father meets sons the first duty performed by the police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com