बाप रे ! तब्बल 73 वर्षांनी 'या' गावची पाण्यासाठीची वणवण थांबली

tap water
tap water
Updated on

तळा : तळा तालुक्यातील सोलमवाडी गावात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थात तब्बल 73 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर घराघरात नळाद्वारे पाणी आले आहे. स्वदेस फाऊंडेशन व लोकसहभागातून हा पाणी पुरवठा सुरू झाल्याने सोलमवाडीतील डोक्यावरून हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांची पायपीट थांबली आहे. त्यामुळे येथील अबालवृद्धांनी आनंद व्यक्त केला आहे.

तळा तालुक्यातील सोलमवाडी गावातील महिलांना वर्षानुवर्ष नदीवरील बोअरवेलचे पाणी डोक्यावर आणावे लागत होते. स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि लोकवर्गणीतून सोलर सिस्टीमच्या साहाय्याने हे प्रत्यक्षात उतरले आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असून त्यामुळेच नागरिकांच्या मनात असलेली कल्पना अस्तित्वात आली. या यशाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळत उदघाटन
कोरोना विषाणूमुळे या कार्यक्रमाला मोठे स्वरुप देता आले नाही. परंतु स्वदेस फाऊंडेशनचे समन्वयक महेश पांचाळ यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, मुंबईचे पदाधिकारी यांनी साधेपणाने सदरचा पाणी प्रकल्पाचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सामाजिक अंतर नियमाचे पालन केले.

पारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर
या यशाचा सर्वाधिक आनंद गेली कित्येक वर्ष पाणी डोक्यावरून आणणाऱ्या महिलांना झाला आहे. घराघरत नळाद्वारे मिळणारे पाणी सोलर सिस्टीमव्दारे मिळणार असून पारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून लाइट बिल कमी कसे राहील, याकडेही लक्ष देण्यात आले आहे.

After 73 years, the village's stopped water crisis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com