
डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डोंबिवली मधील मनसेच्या राजन मराठे, ज्योती मराठे या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबतच शरद पवार गटातील ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही आपल्या मुलासह अनेक समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले.