रायगडच्या किनारी भागांत अलर्ट; उसळणार साडेचार मीटरच्या उंच लाटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार शनिवारपासून आठ दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे. साधारण साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.

अलिबाग : भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार शनिवारपासून आठ दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे. साधारण साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.

ही बातमी वाचली का? मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

या उधाणाचे पडसाद शुक्रवारीही दिसून आले. सकाळी 10.27 वाजता उधाणाने उच्चतम पातळी गाठली होती. साखर- आक्षी, खोराबंदर, दिघीबंदर येथे साधारण तीन  मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. नागरिकांना स्थलांतरित करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे म्हणणे जिल्हा प्रशासनाचे असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

पुढील आठ दिवस या लाटांची उंची वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा असल्याने किनारी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. जीवरक्षक दल, सागरी सुरक्षा रक्षक, मच्छीमार सोसायट्यांच्या सदस्यांना उधाणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून समुद्रकिनारी तैनात राहण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? कोरोना नाही, जूनमध्ये मुंबई पुण्यातील लोकांनी गुगलवर शोधली 'ही' माहिती..

या किनारी गावांनी सावध राहावे
उधाणाचा नेहमी फटका बसणारे पेण तालुक्यातील विठ्ठलवाडी, दादर, अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, बहिरीचा पाडा, मुरूड तालुक्यातील नांदगाव, आगरदांडा,  जीवनाबंदर यांसारख्या किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिकांना सावधनतेचा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert in coastal areas of Raigad; Waves four and a half meters high will rise