esakal | अंधेरी : अभियंत्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अंधेरी : अभियंत्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : मिरा रोड-भाईंदर (Mira Road-Bhayander) महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबिट यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अजय चंद्रशेखर सिंग (Chandrasekhar Singh) या मुख्य शूटरला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी श्रीकृष्ण महिते, यशवंत देशमुख, अमित सिन्हा, प्रदीपकुमार पाठक आणि राजू विश्‍वकर्मा या आरोपींना अटक केली आहे. ते सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहेत. २९ सप्टेंबरला बोरिवली येथे दीपक खांबिट यांच्यावर दुचाकीवरून येत आरोपी अमित व अजय यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात ते थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.

हेही वाचा: 97 लाख रुपये चोरणाऱ्या चोरांना पुणे व नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपींपैकी श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख हे मिरा-भाईंदर मनपाचे कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांनीच दीपक खांबिट यांच्यावर गोळीबार करण्याची सुपारी दिली होती. तपासात ही बाब उघडकीस येताच तीन दिवसांपूर्वी दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

loading image
go to top