नवी मुंबईकरांना दिलासा; अॅन्टीजेन टेस्टला आजपासून झाली सुरूवात 

antigen test
antigen test

नवी मुंबई : शहरातील महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयांमध्ये आजपासून अॅन्टीजेन टेस्ट करण्यास प्रारंभ झाला आहे. या टेस्टमुळे कोव्हिड-19 चे तत्काळ निदान होण्यास मदत होणार आहे. तसेच संशयित रुग्णांची चाचणी करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्याच्या अडचणी दूर होणार आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार आजपासून सर्वत्र ठिकाणी अॅन्टीजेन टेस्ट करण्यास सुरूवात झाली आहे.

नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत संशयित रुग्णांची टेस्ट कमी प्रमाणात होत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. परंतु या परिस्थितीत ज्या संशयित रुग्णांची महापालिकेतर्फे चाचणी केली जाते त्या रुग्णांच्या चाचणीचे अहवाल प्राप्त होण्यास कमालीचा उशिर होत आहे. चाचणी केल्यापासून जास्तीत जास्त एक ते दोन दिवसांत अहवाल मिळणे आवश्यक असताना अहवाल येण्यास तब्बल नऊ दिवसांचा कालावधी लागत आहे. 

त्यामुळे बाधित असणारा व्यक्ती फक्त अहवाल नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरत बसत असल्याने कोरोनाची नवी साखळी निर्माण होत आहे. कोरोनाचे अहवाल उशिरा येत असल्यामुळे एवढा अनर्थ होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने शहरातील सर्वच रुग्णालये भरून गेली आहेत. अतिदक्षता विभाग सुद्धा कमी पडत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत आहे.

या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तत्कालिन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एक महिना आधीच अॅन्टीजेन टेस्ट खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार त्यांची बदली होण्याच्या काही दिवस आधीच अॅन्टीजेन टेस्टचे किट महापालिकेकडे आले होते. त्यादरम्यान आलेले अभिजीत बांगर यांनी शहरातील किटची निकड लक्षात घेऊन आजपासून अॅन्टीजेन टेस्ट करण्यास परवानगी दिली आहे.   

मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

कुठे होते टेस्ट
वाशीतील नवी मुंबई महापालिकेच्या कोव्हिड-19 विशेष रुग्णालयात अॅन्टीजेन टेस्ट करण्यास सुरूवात झाली आहे. वाशी प्रमाणेच नेरूळ आणि ऐरोलीतील कोव्हिड रुग्णालयांमध्येही ही टेस्ट करण्यात येणार आहे. कोव्हिड रुग्णालयांसोबतच महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रातही ही टेस्ट सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. 


अॅन्टीजेन टेस्टची व्याप्ती वाढवणार 
शहरातील नागरीकांना तात्काळ दिलासा मिळावा याकरीता महापालिकेने सद्या 40 हजार अॅन्टीजेन टेस्ट किट खरेदी केल्या आहेत. या किटच्या माध्यमातून चाचणी केल्यावर अवघ्या 30 मिनीटांमध्ये अहवाल प्राप्त होतो. त्यामुळे आणखीन 60 हजार किट्स मागवल्या जाणार आहे. पालिकेतर्फे सरकारकडे एक लाख किटची मागणी केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
----
संपादन :  ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com