मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा प्रमुखपदी निकेत कौशिक यांची नियुक्ती

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा प्रमुखपदी निकेत कौशिक यांची नियुक्ती

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी सहपोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी जयजीत सिंग यांनी बदली करण्यत आली आहे.

गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना कामाची छाप सोडलेल्या कौशिक यांनी पुन्हा मुंबई बदली झाली असून त्यांना आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पद देण्यात आले आहे. कौशिक यांच्या कोकण परिक्षेत्राची जबाबदारी संजय मोहिते यांची बदली करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कोकण परिक्षेत्र अवनत करून पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाचे करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख राजवर्धन यांची नियुक्ती महिला अत्याचार प्रतिबंध विभागात करण्यात आली आहे.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या अतिरिक्त महासंचालकपदी जयजीत सिंग यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. एटीएस प्रमुख देवेन भारती यांना महाराष्ट्र सुरक्षा मंडळावर नियुक्ती देण्यात आली आहे. प्रभात कुमार यांची लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या अतिरिक्त महासंचालकपदी नवल बजाज यांना बढती देण्यात आली आहे.

खालील महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

Appointment of Niket Kaushik as the Head of Economic Crime Branch Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com