esakal | धोकादायक इमारतींच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'बाबत गृहनिर्माण सोसायट्यांचे आयुक्तांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

audit

कोरोनाचा फैलाव सुरूच असल्यामुळे अनेक विभाग प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअर नेमून धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अडचणीचे झाले आहे.

धोकादायक इमारतींच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'बाबत गृहनिर्माण सोसायट्यांचे आयुक्तांना साकडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आला आहे. पावसाळ्यात दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेने या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी धोकादायक इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांनी केली आहे. 

BIG NEWS - मुंबईतील परिस्थिती नक्की कशी आहे? जाणून घ्या डॉ. ओक यांच्याकडून...

कोरोनाचा फैलाव सुरूच असल्यामुळे अनेक विभाग प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअर नेमून धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अडचणीचे झाले आहे. म्हणून महापालिकेनेच स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी गृहनिर्माण संस्थानी केली आहे. फोर्ट भागात अनेक जुन्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतर या इमारतींची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

BIG NEWS - आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

मुंबईतील 23 अतिधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करून त्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. महापालिकेने 2014मध्ये सुमारे 1200 धोकादायक इमारतींची यादी न्यायालयाला दिली होती. 2017 मध्ये भेंडीबाजारातील इमारत कोसळल्यानंतर न्यायालयाने अतिधोकादायक इमारतींची यादी सादर करण्यास सांगितले होते. 

BIG NEWSठाणे महापालिका आयुक्तांचीही तडकाफडकी बदली! वाचा, नवे आयुक्त कोण आहेत ते?

रहिवाशांत भीतीचे वातावरण
मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी 499 धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली. या इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले होते. पावसाळा सुरू झाल्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ask to Commissioner of Housing Societies for structural audit of dangerous buildings

loading image