मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे दाैरेही वादात... नक्की काय..वाचा

File Photo
File Photo

मुंबई : मुंबईतील नगरसेवकांचे अभ्यास दौरे नेहमीच वादात सापडलेले असतात. महापालिकेच्या लेखा परीक्षकांनीही या दौऱ्यांवर आक्षेप नोंदवले आहेत. दौऱ्यांना गैरहजर राहाणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून दौऱ्याचा खर्च वसूल करण्याची सूचना लेखा परीक्षकांनी केली आहे. 

पालिकेच्या मुख्य लेखापालांनी 2013-14 आणि 2014-15 या दोन वर्षांच्या विविध समित्यांच्या दौऱ्यांचा लेखा परीक्षण अहवाल महासभेपुढे मांडला आहे. अहवालात लेखापालांनी दौऱ्यांना आयत्या वेळी गैरहजर राहाणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. दौऱ्याचा खर्च पालिकेमार्फत केला जातो; मात्र, संपूर्ण नियोजन झाल्यानंतर आयत्या वेळी गैरहजर राहाणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून शुल्क वसूल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. नगरसेवकांचे दौरे फक्त नावापुरते अभ्यास दौरे असतात.

प्रत्यक्षात ती सहलच असते, असा आक्षेप आतापर्यंत घेतला जात होता. त्यामुळे नगरसेवकांचे अभ्यास दौरे नेहमीच वादात असतात. नगरसेवक दौऱ्याला गैरहजर राहिल्यास दौऱ्याचे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यांच्या नियोजनासाठी झालेला खर्च त्यांच्याकडूनच वसूल करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

निविदा मागवून नियोजन 
समित्यांच्या अभ्यास दौऱ्यांचे नियोजन पालिकेच्या राजशिष्टाचार विभागामार्फत केले जाते; मात्र, निविदा मागवून टूर ऑपरेटरमार्फत दौऱ्याचे नियोजन करण्याची करण्याची शिफारसही या अहवालात करण्यात आलेली आहे.

"अभ्यास' दौऱ्यासाठी आवडीची ठिकाणे 
केरळ, बंगलोर, हैदराबाद, उत्तरखंड, म्हैसूर, उटी, अंदमान, जयपूर, सिक्कीम.
राजकीय वादही चुकले नाहीत 
नगरसेवकांच्या दौऱ्यांवरून अनेक वेळा राजकीय वादही निर्माण झाले आहेत. काही वेळा पालिकेच्या गटनेत्यांचे परदेश दौरे राज्याच्या नगरविकास विभागाने रद्द केले आहेत; तर काही वेळा पक्षाच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. काही वर्षांपूर्वी गटनेत्यांच्या परदेश दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आक्षेप नोंदवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com