टोयोटाची 80 लाखांची लक्‍झरी एमपीव्ही भारतात

file
file

मुंबई : टोयोटाने आपली लक्‍झरी एमपीव्ही वेलफायरचे भारतात अनावरण केले आहे. या वेलफायरला ई फोर या हायब्रिड सिनर्जी ड्राइव्हसोबत सादर करण्यात आले आहे. या एमपीव्हीची किंमत 79.50 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली असून ही किंमत मर्सिडिझ बेंझ व्ही क्‍लासच्या बेस व्हेरियंटच्या किमतीपेक्षा अधिक आहे. व्ही क्‍लासची एक्‍स शोरुम किंमत 68.4 लाख रुपयांपासून सुरू होते. 


टोयोटा वेलफायर भारतामध्ये कंप्लीटली बिल्ट अप (सीबीयू) युनिटमध्ये येणार असून, ती पर्ल व्हाईट, ब्लॅक, बर्निंग ब्लॅक, ग्रेफाइट रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. जाणून घेउ तीच्याविषयी आणखी माहिती 

इंजिन आणि पॉवर 
ही 7 आसनी लक्‍झरी एमपीव्ही 2494 सीसी, 2.5 लीटर पेट्रोल इंजिनसह साद करण्यात आली आहे. ती 115 एचपी पॉवर आणि 198 एनएमचा टॉक निर्माण करते. सोबत दोन इलेक्‍ट्रिक मोटर देण्यात आल्या आहेत. या मोटर पुढील भागात 141 एचपी आणि रिअरसाठी 67 एचपी पॉवर निर्माण करतात. कंबाईंड पॉवर आउटपुट 196 बीएचपी आहे. इंजिन 4 व्हील ड्राईव्ह फोर्थ जनरेशन हायब्रिड इलेक्‍ट्रिक इंजिन आहे. 

फिचर्स 
टोयोटा वेलफायरची लांबी 4935 एमएम, रुंदी 1850 एमएम आणि उंची 1895 एमएम आहे. एमपीव्हीचा व्हीलबेस 3000 एमएम आहे. यामध्ये कॉर्नरिंग फंक्‍शनसोबतच ऑटो एलईडी हेडलॅम्प, डीआरएल, 17 इंच हायपर क्रोम अलॉय व्हील्स, फॉग लॅम्प्स, रिअर कॉम्बिनेशन लॅम्प, इलेक्‍ट्रिक स्लाइडिंग डोअर्स देण्यात आले आहेत. या सात आसनी लक्‍झरी एमपीव्हीमध्ये मागे बसणाऱ्यांसाठी इलेक्‍ट्रॉनिक फुटरेस्ट, कप होल्डर्स, एचडीएमआय आणि वायफायसह रुफ माउंटेड एंटरटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. वेलफायरच्या अन्य फिचर्समध्ये ड्युअल सनरूफ, 17 स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, 16-कलर रूफ एंबिएंट इल्यूमिनेशन, पुश स्टार्टसोबत स्मार्ट एंट्री, पैनोरैमिक व्यू मॉनिटर, दूसऱ्या रोमध्ये पॉवर्ड कैप्टन सीट्‌स, बेस्ट इन क्‍लास रिक्‍लाइनर लॉन्ग स्लाइड सीट्‌स, वेंटिलेटेड सीट स्विचेस, वीआईपी स्पॉट लाइट, मोरी फंक्‍शनसह कूल्ड एंड हीटेड सीट्‌स, लॉन्ग आर्म रेस्टसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. 

सुरक्षा वैशिष्ट्ये 
टोयोटो वेलफायरच्या सेफ्टी फिचर्समध्ये 7 एसआरएस एअर बॅग, व्हेईकल डायनॅमिक्‍स इंटीग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट व रियर सेंसर्ससोबत पार्किंग असिस्ट अलर्ट, व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ब्रेक होल्ड, ऐबीएस, टीपीएमएस, इमोबिलाइजर व अलार्म यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com