
Mumbai Local
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : तंत्र-मंत्र, काळ्या जादूच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित बंगाली बाबांचा गोरखधंदा ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून उघडकीस आणला आहे. यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ‘बाबा खान बंगाली’च्या नावाने फसवणूक करणाऱ्या अब्दुल समद मोहम्मद इरशाद या तरुणाला अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने सर्व आरपीएफच्या ठाण्यांना दिले आहेत.