

Badlapur BMW Car Accident Video Viral
ESakal
बदलापूर : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील एरंजाड परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळून अनेक पलटी मारल्या. यात फुटबॉलपटू योगेश नेगी (वय २६) आणि त्याची मैत्रीण रिबेका जेकब (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचा मालक अंगद गिल (वय २५) गंभीर जखमी झाला आहे.