hitendra thakur
sakal
विरार - दिल्ली येथील जंतर-मंतरवर आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आता वसई-विरार क्षेत्रात उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि बहुजन विकास आघाडीची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विरार येथील विवा कॉलेज येथे आज (22 जुलै) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी केंद्र प्रशासन व पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत धिक्कार करत विद्यार्थ्यांवर झालेला हा अन्याय अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.