Mumbai News: गरीबनगर अखेर अतिक्रमणमुक्त, वांद्रेतील बेकायदा बांधकामे १०० टक्के जमीनदोस्त

Bandra Encroachment: वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेची कारवाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या परिसरातील बेकायदा बांधकामे १०० टक्के जमीनदोस्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
Bandra Encroachment

Bandra Encroachment

ESakal

Updated on

मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शुक्रवारी (ता. २२) सायंकाळपर्यंत परिसरातील १०० टक्के बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण सुमारे ४०० अनधिकृत संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या असून, रेल्वेची जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेली ही मोहीम शनिवारी (ता. २३) अधिकृतरीत्या पूर्ण होणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com