

BEST Bus Strike
ESakal
मुंबई : बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या अचानक संपामुळे आज मुंबईतील बेस्ट बस सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत बेस्टच्या स्वतःच्या आणि भाडेतत्त्वावरील (वेट लीज) मिळून २,७०० हून अधिक नियोजित बसेसपैकी केवळ ४ बसेस रस्त्यावर धावू शकल्या. यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य मुंबईकरांना सणासुदीच्या किंवा कामाच्या दिवशी प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.