Best Workers Strike : बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिलासा! सर्व मागण्या मान्य झाल्याने अखेर संप मागे

mumbai best bus
mumbai best bussakal

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे कर्मचारी त्यांच्या मागण्यासाठी संपावर गेले होते.

या कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री एक वाजता बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सकाळी हा संप मागे घेण्यात आला आहे. हे कंत्राटी कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत होते. यानंतर या आंदोलनाची शासनाकडून दखल घेण्यात आली.

mumbai best bus
Ravikant Tupkar News : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत...; पक्ष सोडण्याबाबत रविकांत तुपकरांनी स्पष्ट केली भूमिका

कोणत्या मागण्या मान्य झाल्या?

मुख्यमंत्री शिंदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात येईल. पण त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त यांची बैठक घेण्यास सांगीतले आहे. तसेच या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भरघोस वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

या सोबतच वार्षिक रजा या भर पगारी करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांनी वार्षिक बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वेतनवाढ वाढ मिळावी. तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी मोफत पास देण्याची सुविधा देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.

यासोबतच अपघात झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास दूर करण्याबाबत आणि मागील आठ दिवस आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच कंत्राटी कामगारांमध्ये रिटायर्ड कर्मचाऱ्यांएवजी नवीन तरुणांना नोकरीत अधिक संधी देण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

mumbai best bus
Chhatrapati Sambhaji Raje : "मी निशब्द झालो..."; छत्रपती संभाजी राजेंची भर पावसात वाट पाहत थांबलेल्या आजींसाठी भावनिक पोस्ट

मागील आठ दिवसांपासून बेस्ट चे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने मुंबईकरांचे हाल होत होते. मात्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने अखेर संप मिटला असून यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com