Bhivandi Accident: टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

Accident News
Accident NewsEsakal

Bhivandi Accident: भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी घडली. अपघातात महिलेचा पति गंभीर जखमी झाला असून नाशिक-ठाणे मार्गावरील पिंपळास फाट्याजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी टेम्पोचालकाला अटक करून त्याच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News
Nashik Accident News : चारचाकीच्या धडकेत 2 दुचाकीस्वार ठार

शोभा पुंडलिक पाटील (५५) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून पुंडलिक पाटील असे जखमी पतिचे नाव आहे. वडवली येथील शोभा पाटील आणि पुंडलिक नारायण पाटील हे दाम्पत्य दुचाकीवरून गुरुवारी सकाळी वळ येथील नातेवाईकांकडे जात होते.

दरम्यान, साडेअकराच्या सुमारास नाशिक-ठाणे वाहिनीवरील पिंपळास फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून शान मोहम्मद इकबाल अन्सारी (वय ३५, रा. उत्तर प्रदेश) याने भरधाव टेम्पो चालवून पुंडलिक पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Accident News
Otur Accident: ओतूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन तरूण जागीच ठार

त्यामुळे झालेल्या अपघातात पुंडलिक यांच्या दोन्ही पायाला इजा झाली; तर शोभा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातप्रकरणी टेम्पोचालक शान अन्सारीच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Accident News
Nashik Accident News : चारचाकीच्या धडकेत 2 दुचाकीस्वार ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com