
भिवंडीत एका डॉक्टरचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला. अपघातानंतर डॉक्टरच्या अंगावरून कंटेरन गेला. यात ड़ॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. भिवंडीत ही घटना घडली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सर्वोच्च न्यायालयानंही रस्त्यांच्या दुरवस्थेवरून फटकारलं होतं. त्यातच आणखी एका अपघातात सामान्य नागरिकांचा बळी गेल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.