Railway: फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची मोठी कारवाई; लाखोंचा दंड केला वसूल

 dadar without ticket
dadar without ticketesakal

मध्य रेल्वेने स्थानकांवरील फुकट्या प्रवाशांची नाकेबंदी सुरू केली आहे. शुक्रवारी दादर रेल्वे स्थानकावर ७८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि १३ आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७३६ फुटक्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. ज्याद्वारे तब्बल ४ लाख ९८ हजार रुपयांच्या एवढा दंड वसूल करण्यात.

 dadar without ticket
Railway Ticket : रेल्वेचे संगणीकृत तिकीट आरक्षण बंद!

रेल्वे प्रशासनाकडून विनातिकीट प्रवासी यांची कठोर तपासणी सुरू आहे. याचाच भाग म्हणून विविध गर्दीच्या स्थानकांवर विशेष तिकीट तपासनीस पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी १२ जानेवारी २०२४ रोजी दादर रेल्वे स्थानकावर ७८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन अधिकारी, १३ आरपीएफ कर्मचारी टीमने तिकीट तपासणी मोहीम राबवली.

 dadar without ticket
Railway News: वर्षभरात विविध गुन्ह्यात आरपीएफ पोलिसांनी हजारहुन अधिक आरोपींना केली अटक

या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान पथकाने दादर स्थानकांचा प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, स्थानक प्रवेशद्वार याठिकाणी तिकीट तपासणीस पथकांनी सखोल तिकीट तपासणी राबवली. या मोहिमेदरम्यान १७३६ फुटक्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ९८ हजार रुपयांच्या एवढा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान टीसींनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम पाहता एका टीसीने सरासरी ६ हजार ३९१ रूपयांचा दंड वसूल केला आहे.विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष ट्रेनमध्ये तिकीट तपासणीचे आयोजन करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

 dadar without ticket
Railway Accident: हेडफोन बेतला जीवावर; एक्स्प्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com