

Shivkumar Jha attend BMC Standing Committee Meeting
ESakal
मुंबई : राजकारणात आपले वर्चस्व गाजवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून विविध कार्यपद्धती राबवल्या जातात. मात्र मुंबई महापालिकेत सत्ताधारी पक्षाने बहुमत टिकवण्यासाठी विचित्र प्रकार केल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील (Mumbai BMC Standing Committee) बहुमत टिकवण्यासाठी भाजपने आजारी नगरसेवकाला रुग्णालयातून बैठकीत आणल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेच्या सभागृतिहातील या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.