भाजपनेत्याचा ठाकरे गटात प्रवेश, नाशिकमध्ये शिंदे गटाच्या राजकीय अस्तित्वाला धोका!

uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : भाजपचे अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिंदे गटाला मोठा धक्का मानल्या जात आहे. तसेच ठाकरे गटाची ताकद वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हिरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

हिरे कुटुंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहीलं आहे.  त्यांच्या राजकीय अस्तित्वाला दादा भुसे यांनी काही वर्षांपूर्वी सुरुंग लावलं होतं. त्यामुळे दादा भुसे यांच्या विरोधातील भविष्यातील ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे असल्याचे स्पष्ट झाले. नाशिकमध्ये दादा भुसे यांना चांगला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांचा माजी आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. माझ्या मतदारसंघात भाजपचे अस्तिव नव्हते. ते आम्ही निर्माण केले. मात्र ५० गद्दार भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. त्यानंतर भाजपला आमची गरज राहीली नाही. माझ्या मतदार संघात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र भाजपने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. जो पक्ष शेतकऱ्यांना वाचवू शकत नाही त्या पक्षाचा मी त्याग केला. 

uddhav thackeray
नाशिक पदवीधर निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट येणार; बावनकुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, "बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले. हिरेंनी सांगितलेला भाजपचा त्रास २५ ते ३० वर्ष आम्ही भोगला आहे. आम्ही त्यांना पालखीत बसून फिरवले. मात्र बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही. हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे."

uddhav thackeray
Share Market Closing : शेअर बाजारासाठी आजचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे; गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान

"लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत. महिन्याभरात मालेगावात सभा घेऊ. आज जो सर्वे प्रसिद्ध झाला त्यात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडील ३४ जागा मिळणार असल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र  सर्व एकत्र लढलो तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील. जनतेनं ठरवलं तर ४८ जागा देखील महाविकास आघाडी जिंकेल", असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

uddhav thackeray
U19 Cricket World Cup : अखेर 19 वर्षांच्या मुलींनी न्यूझीलंडचा अवघड पेपर सोडवला, गाठली वर्ल्डकपची फायनल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com