'...हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार' : शेलार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

फडणवीस आणि पवार हे एकत्र आल्यामुळे पक्षात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई : 'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठराव संमत करेल, याचा मला विश्वास आहे. आम्ही लवकरच बहुमत सिद्ध करू आणि हेच ऑपरेशन फडणवीस-पवार आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शनिवार सकाळपासून सुरू झालेल्या राजकीय वादंगामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज (ता.24) भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक वसंत स्मृती दादर येथे पार पडली. या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी बबनराव लोणीकर आणि बबनराव पाचपुते उपस्थित होते.

- अजित पवारांनी पद बदलले, पण पक्ष तोच ठेवला

ते पुढे म्हणाले, 'महायुतीला दिलेला जनादेश हा सुस्पष्ट असून 180 जागांवर होता. मात्र, आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने याची हेटाळणी केली. गेल्या 20 वर्षांपासून महायुतीच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली, याचा उल्लेख उपस्थित आमदारांनी केला. तसेच फडणवीस आणि पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सर्व आमदारांनी बैठकीत संमत करण्यात आला असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.

- Breaking : 'अजित पवारही राष्ट्रवादीसोबत' (व्हिडिओ)

शनिवारी (ता.23) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे एकत्र आल्यामुळे पक्षात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. आता समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे जाणार आहे.

-  सुप्रिया सुळे का म्हणतायत, 'आपली काळजी घ्या..'

भाजपच्या आमदारांना कुठेही ठेवण्याची गरज नाही. कारण आमच्या नेत्यांचा आणि आमदारांचा एकमेकांवर विश्वास आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना स्वत:च्या आमदारांवर विश्वास नाही. ते काय विश्वासदर्शक सरकार आणणार? सोनिया गांधींशी शिवसेनेने केलेली सलगी हा गोराबाजार आणि आम्ही अजित पवार यांच्याशी केलेली सलगी हा काळाबाजार असा कसे म्हणता? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar comment about BJP MLA meeting held in Mumbai