esakal | "कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

"कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही"

"कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही"

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : कोकणात अनेकदा जत्रा लागत असतात. एका जत्रेत दूकान नाही मिळाले तर दुसऱ्या जत्रेत जावून दूकान लावायचे असे काम काही नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, आम्ही आहोत तिथेच आहोत. अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचा समाचार घेतला. आपल्याला असल्या नगरसेवकांपेक्षा मतदरांचा दृष्टांत हवा आहे. जे जातात त्यांची नावे घेऊन त्यांना फार काही मोठे करण्याची गरज नाही असे नाईकांनी नाव न घेता नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले. 

मोठी बातमी - पनवेलमध्ये अजूनही खुलेआम सुरु आहे 'मृत्यू'ची विक्री....

महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन पक्षांनी नाईकांविरोधात मोट जुळवली आहे. महापालिकेतील नाईकांची निर्विवाद सत्ता उलथवण्यासाठी मविआने कंबर कसली आहे. त्याकरीता नाईकांचे मनसबदार फोडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. तुर्भेतील मातब्बर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह त्यांचे तीन नगरसेवक फोडण्याची किमया शिवसेनेने साधली आहे. कुलकर्णींपाठोपाठ भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सद्या शहरात रंगली आहे. या पार्श्‍वभूमिवर नाईकांनी मौन बाळगले होते. परंतू शिरवणे येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कूंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून नाईकांनी विरोधकांवर टीका केली. 

मोठी बातमी जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात...

प्रसिद्धी माध्यमांना टोला 

नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या प्रसिद्धी माध्यमांनी लावलेल्या बातम्यांवर आमदार गणेश नाईक यांनी टीका केली. कोणी कुठून आला आणि कुणीही त्यांना हार घातले, याची बातमी प्रसिद्धी माध्यमांनी चार दिवस चालवली, त्यानंतर त्याच नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामे दिले, परत त्यांची बातमी लागली, नंतर कुणाकडे जावून हारतुरे घातले, पुन्हा त्यांची तिच बातमी, म्हणजे एकाच इव्हेंन्टची प्रसिद्धी माध्यमांनी चार दिवस चार वेळा बातम्या लावल्या. असे बोलून नाईकांनी त्यांच्या भाषणात प्रसिद्धी माध्यमांची टर उडवली.  

bjp leader ganesh naik targets corporators those entered mahavikas aaghadi