
रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाड्या लावल्यानं वाहतूक कोंडी होते. कधी कधीत फुटपाथवरही गाड्या लावल्या जातात. अशा प्रकारांमुळे पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालावं लागतं आणि यामुळे अपघाताचीही शक्यता असते. आता दादरच्या स्वामीनारायण मंदिरासमोर फुटपाथवर भाजप नेत्याच्याच गाड्या पार्क केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे गाडी इथं पार्क का केलीत? आम्ही कुठून चालायचं असं एका सामान्य नागरिकाने विचारल्यावर पोलिसानेच गाडी कुणाची आहे माहितीय का असा दम भरला. तर चालकानेही तुझ्या सारखे बरेच येतात म्हटलं.