मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला व मनसेला एकाच वेळी शह देण्यासाठी मुंबई भारतीय जनता पक्षानेही मराठी माणसांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी वेगळा उपक्रम सुरु केला आहे.
फक्त मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबई भाजप अंतर्गत हे व्यासपीठ स्थापन झाले आहे. मराठी कट्टा असे या उपक्रमाचे नाव असून मंगळवारी (26 ऑक्टोबर) सायन येथे याचा पहिला कार्यक्रम होईल. माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रतीक्षानगरच्या रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदानात संध्याकाळी हा कार्यक्रम होईल.
पाच लाख युवक जोडणार
तर मुंबई भाजपा युवा मोर्चा आयोजित युवा योध्दा संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्याला सुरुवात होत आहे. पाच लाख युवक या प्रवासात जोडले जातील. या यात्रेदरम्यान प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन शाखांचे उद्घाटन देखील करण्यात येईल. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील आदींचा यात सहभाग राहील. मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार ही यात्रा होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.